नोकरीसाठी पाच लाख न आणल्याने विवाहितेचा छळ : पतीसह पाच आरोपींविरोधात गुन्हा


जळगाव : नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात पाच आरोपींविरोधात गुन्हा
फरजाबानो ईरफान शेख (39, रा.ताजबाब मास्टर कॉलनी, जळगाव) या उच्च शिक्षित महिला आहेत. त्यांचा विवाह इरफान शेख शफियोद्दीन शेख (रा. मालेगाव) यांच्याशी रितीरीवाजानुसार सन 2011 मध्ये झाला. लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्यांना पती इरफान शेख याने नोकरी साठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांना मुलबाळ झाले नाही म्हणून सासू, दिर, नणंद यांनी शारिरीक व मानसिक त्रास देणे सुरू केले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यांनी शनिवार, 30 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिसात पतीसह इतर जणांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती इरफान शेख शफियोद्दीन शेख, सासू लतीफाबानो शफियोद्दीन शेख, दीर रीजवान शफियोद्दीन शेख, ननंद निखत उर्फ मोना शफियोद्दीन शेख आणि इतशत अजगर शेख (सर्व रा. मालेगाव, जि.नाशिक) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय धनगर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !