एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुचाकी चोरटा


जळगाव : दुचाकी चोरट्याच्या एमआयडीसी पोलिसांनी शहरातील अजिंठा चौफुलीवरून मुसक्या आवळल्या. शहरातील वासुदेव जोशी कॉलनीतून मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी 25 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरट्याने लांबवल्याचा आरोप आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (20, रा.इंदिरा गांधी चौक, धामणगाव, जि.बुलढाणा) असे अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
शहरातील वासुदेव जोशी कॉलनीत राहणारे अनिल सुधाकर जाधव (वय-52) हे कुटुंबियांसह राहतात. बांधकामाचे काम करून उदरनिर्वाह करतात. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत घराच्या बांधकामासाठी दुचाकी (एम.एच. 19 सी.सी.2077) ने गेले. त्यावेळी त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ दुचाकी लावून बांधकामाच्या ठिकाणी निघून गेले. दुपारी चार वाजेच्या सुमारास चोरट्याने 25 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
या गुन्ह्याचा शोध घेत असतांना शहरातील अजिंठा चौकात अंकुश शिवाजी सुरळकर (20, रा.इंदिरा गांधी चौक, धामणगाव, जि.बुलढाणा) हा संशयास्पद हालचाल करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांच्या पथकातील सहा.फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे व योगेश बारी आदींनी कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता संशयिताने वासूदेव जोशी कॉलनीतून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !