मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक : गुन्हे शाखेची कामगिरी
जळगाव : मोबाईल चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी समाधान प्रल्हाद पाटील (कस्तुरी नगर जामनेर) यास जळगाव गुन्हे शाखेने अटक केली. संशयीताविरोधात जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचा सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयीताला तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, पोलीस नाईक कृष्णा देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

