चोरीच्या 15 दुचाकींसह भामटा जाळ्यात : जळगाव शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी


जळगाव : जळगाव शहरातील विविध भागातून चोरीच्या 15 दुचाकी चोरणार्‍या भामट्यास जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहीम मुसा तांबोळी (26, रा.तोंडापूर, ता.जामनेर, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरी होत असल्याने याबाबत शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याबाबत बाबत विशेष सूचना दिल्या होत्या. याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी डी.बी. पथक तयार करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकातील पथकाने सापळा रचून संशयीत आरोपी इब्राहीम मुसा तांबोळी (26, रा.तोंडापूर, ता.जामनेर, जि.जळगाव) याला मोठ्या शिताफीने शहरातील गोलाणी मार्केटमधून शहरातून अटक केली. आरोपीने 15 दुचाकींची चोरी केल्याची कबुली देत 10 मोटरसायकली काढून दिल्यात. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भास्कर ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल, प्रणेश ठाकूर, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, संतोष खवले, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, किशोर निकुंभ, तेजस मराठे योगेश इंधाटे यांनी कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !