खान्देश साहित्य परीषद वर्धापनदिनानिमित्ताने कथा व काव्यलेखन स्पर्धा
चाळीसगाव : महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांचा मानबिंदू व प्रस्थापित साहित्यीक यांच्या सन्मानासाठी स्थापन झालेल्या खान्देश साहित्य परीषद (म.रा.) चाळीसगावच्या वतीने स्व.विमलाबाई पांडुरंग वाघ स्मृती पोस्टकार्ड काव्यलेखन व स्व.शंकर परशराम मोरे स्मृती राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी असे आहेत नियम
स्पर्धकांनी साहित्य साहित्य एक कृतीकाव्य पोस्टकार्डवरच पाठवावे, कथा ही संपूर्ण आंतरदेशीय पत्रावरच लिहून पाठवावी, एकाच स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविता येईल, काव्य किंवा कथा, कोणतेही शुल्क नाही, कविता किंवा कथा फक्त मराठी भाषेत पाठवावी, काव्य किंवा कथा अप्रकाशित व स्वलिखीत असावी तसे आपल्या सहीचे पत्र सोबत जोडावी, आपला स्वतःचा पत्ता व मोबाईल नंबर जोडावा, स्पर्धा संबंधी व निकाल सर्व नियम राखून ठेवलेले आहेत, स्पर्धेचा निकाल वर्तमानपत्रातून व वैयक्तिक कळवला जाईल, हे साहित्य 10 डिसेंबरपर्यंत पाठवावे तसेच संपर्कासाठी 9404048601 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य आयोजक खा.स.प. चे सचिव चित्रकार कवी दिनेश चव्हाण, संघटक कवी सुनील गायकवाड व खा.स.प.चे कार्याध्यक्ष गौतमकुमार निकम कळवितात.

कथा व कविता पाठवण्यासाठीचा पत्ता असा
साहेबराव शंकर मोरे, 25 अ श्रद्धेय टॉवर, सुवर्णमार्ग शास्रीनगर मार्ग, चाळीसगाव, जि.जळगाव
