मध्यरात्री दुचाकी पेटली : जळगावातील घटना


जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरात दुचाकीला मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुचाकीचे नुकसान झाले. आग नेमकी कश्यामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

दुचाकीला आगीमुळे नुकसान
शिवाजी मुरलीधर बारी (48, रा.हरीविठ्ठल नगर) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 बी.पी.3823) क्रमांकाची दुचाकी असून 2 नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सर्व झोपलेले असतांना अंगणात पार्किंग करून लावलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी शिवाजी बारी यांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. शिवाजी बारी यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !