लोकप्रिय आमदार किशोरआप्पा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त निखील राजपूत यांनी केला सत्कार
वाढदिवसानिमित्त विविधि क्षेत्रातील मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
पाचोरा :पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून तसेच सोशल मिडीयावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. भुसावळातील रहिवासी तथा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत यांनी प्रत्यक्ष भेटून आमदार किशोर पाटील यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी विविध विषयांवर चर्चाही झाली. याप्रसंगी आमदारांनी निखील राजपूत यांच्या राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कामाविषयी कौतुक करीत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
यांची होती उपस्थिती
सत्काराच्या कार्यक्रमास अक्षय प्रताप न्हावकर भैय्या राजपूत, वैभव राजपूत, अनिल राजपूत (टिलू अप्पा), अमोल राणे, गोलू कोल्हे, चेतन पाटील, निलेश ठाकूर, दामोदर राजपूत, सोनू राजपूत, मयूर महाजन, शुभम गुंजाळ यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

