गौण खनिजाची अवैध वाहतूक : दोघांविरोधात गुन्हा


पाचोरा : तालुक्यातील हडसन शिवारात बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोरा तालुक्यातील हडसन शिवारातून विनापरवाना गौण खनिजाची चोरटी वाहतूक करतांना ट्रॅक्टर चालक राजेंद्र उर्फ दादाभाऊ सुरेश (रा.संभाजी नगर, बाहेरपुरा) 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असतांना पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांना आढळून आला. ट्रॅक्टरवर कारवाई करीत असतांना एक अनोळखी व्यक्ती दुचाकी (एम.एच. 19 बी.डी.7943) वर येवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी ट्रॅक्टर चालक राजेंद्र सुरेश पाटील याच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सोनवणे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !