महिलेच्या गळ्यातून 80 हजाराची पोत धूमस्टाईल लंपास


जळगाव : जामनेर येथे नातेवाईकाचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 80 हजारांची सोन्याची चैन चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविली. ही घटना जळगाव-औरंगाबाद रोडवर बाफना गो शाळेजवळसमोर 2 रोजी दुपारी चार वाजता घडल्ी. घडली.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रिंगरोड परीसरातील रहिवासी सरोज प्रफुल्लकुमार चोपडा (56) या मंगळवारी सकाळी त्यांच्या काकसासर्‍यांच्या बाराव्याच्या कार्यक्रमासाठी जामनेर येथे गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 पतीसह दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.आर.4196) ने जळगावकडे परतत असता जळगाव-औरंगाबाद रोडवर बाफना गोशाळेसमोर चोपडा यांच्या मागून भरधाव वेगाने दुचाकीवरुन दोन जण आले. त्यापैकी मागे बसलेल्या एकाने सरोज चोपडा यांच्या गळ्यातील 80 हजारांची चैन धुमस्टाईल तोडून नेली व भरधाव वेगाने पसार झाले. याप्रकरणी सरोज चोपडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतीलाल पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !