सुप्रीम कॉलनी, गणेश कॉलनीतून चोरट्यांनी लांबवल्या दुचाकी
जळगाव : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. पहिल्या घटनेत आझाद बाबुलाल पिंजारी यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच.19 सी.के.0183) सुप्रीम कॉलनीतील घरासमोरुन 28 ऑक्टोबर रोजी रात्री चोरीस गेली. या प्रकरणी पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या घटनेत 31 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी गणेश कॉलनीतील युनिटी चेंबर समोरुनही दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.जी.4500) चोरीस गेली.
