जळगावात तरुणांमध्ये हाणामारी ; चौघे जखमी


जळगाव : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन भुसावळ रोडवरील पन्नालाल वखारजवळ तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली. मारहाणीत दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीला कट लागल्यावरून हाणामारी
तांबापुरा परीसरातील अजमेरी गल्लीतील रहिवासी फरीद महंमद मुलतानी (२०) हा गुरुवारी त्याचा मित्र राहुल सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने फटाके घेण्यासाठी सिंधी कॉलनी येथे गेले होते. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील फटाके घेऊन पाचोरा रोडने तांबापुर्‍याकडे जात असतांना पाचोरा रोडने जळगावकडे येणार्‍या मालवाहु वाहनाने दुचाकीला कट मारला. मालवाहू वाहनांवरील चालकास कट का मारला त्याचा जाब विचारत तो निघून गेला. त्यानंतर मुलतानी व त्याचा मित्र सोनवणे याने त्याचा पाठलाग करून भुसावळ रोडवर पन्नालाल वखारजवळ वाहन थांबवले. दुचाकीला कट का मारला त्याचा जाब विचारत असतांना घटनास्थळी दाऊद शहा हा आला. त्याने चारचाकी चालक माझा मित्र असून तुम्ही येथून निघून जा, असे सांगत मुलतानी व सोनवणे यांना शिविगाळ केली. राहुल सोनवणे याने मोहनसिंग बावरी व त्याच्या इतर मित्रांना घटनास्थळी बोलावले तर दाऊद शहा यानेसुद्धा फोनवर सात ते आठ जणांना घटनास्थळी बोलावले. या ठिकाणी तरूणांच्या दोन्ही गटात हाणामारी झाली. मालवाहु वाहनावरील चालकाच्या बाजूने असलेल्या सात ते आठ जणांनी मुलतानी व त्याच्या मित्रांवर दगडफेक केली तर यात दाऊद शहा याने राहुल सोनवणे याच्या छातीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. हाणामारीत राहुलसह फरीद मुलतानी, मोहनसिंग बावरी आणि अनिस हमीद पटेल व अनिल रमेश चौधरी या चौघांना दुखापत होवुन ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी फरीद मुलतानी याने दिलेल्या फिर्यादीवरून दाऊद शहा, अरबाज शहा, रफत शेख, इकबाल शेख, इकबाल जुनेद, भाई शेख, साहिल शहा, रेहान शेख (सर्व रा. तांबापुरा) या आठ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !