चाळीसगावातील चित्रकार व कवी दिनेश चव्हाण यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर


तेजभूषण फाउंडेशनने घेतली कार्याची दखल : पुण्यात 26 डिसेंबर रोजी पुरस्काराचे वितरण

चाळीसगाव : चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना कला, साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय तेजभूषण सरस्वती कला गुरुरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतचे पत्र तेजभूषण फाउंडेशनतर्फे त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. तेजभूषण फाउंडेशन, वाशीम (महाराष्ट्र राज्य) तर्फे पुणे येथे रविवार, 26 डिसेंबर 2021 रोजी होणार्‍या राज्यस्तरीय संमेलनात चव्हाण यांना गौरवण्यात येणार आहे.

दिनेश चव्हाण यांच्या कार्याची दखल
दिनेश चव्हाण यांचे कला क्षेत्रातील विविध कलाकृती नेहमी वर्तमानपत्र, दर्जेदार दिवाळी अंक, मासिके यात नेहमी पहावयास मिळतात. पोट्रेट, निसर्गचित्र हे त्यांचे आवडते विषय. शिवाय स्केचेस, कॅरिकेचर, नाईफ वर्क, कोलाज आर्ट, यातही त्यांचा विशेष हातखंडा आहे, तसेच कथाचित्र, व्यंगचित्र, चित्र चारोळी, कविता, गायन, लेख, कथा हे कला साहित्य प्रकारातून सतत त्यांचे लिखाण प्रकाशित होत असते. सामाजिक कार्यातही ते जेसीआय चाळीसगाव सिटीचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या साहित्यकृतींना त्यांनी रेखाटन व मुखपृष्ठ दिले आहेत. महाराष्ट्रातील विविध संघटना, संस्था, साहित्य समेलनाना त्यांचे लोगो झळकले आहेत. त्यांना याबद्दल अनेक मान ,सन्मान, पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !