दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय : जळगावातून पुन्हा दुचाकी लांबवली


जळगाव : शहरातील रेल्वे स्थानक परीसरातून तरूणाची 20 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पार्किंगमधून लांबवली दुचाकी
शुभम विष्णू घुरे (25, रा.कासमवाडी, जळगाव) हा तरूण मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. गुरूवार, 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 ते 6.30 वाजेच्या दरम्यान जळगाव रेल्वे स्थानक परीसरात (एम.एच. 19 सी.एस. 4395) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली 20 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. शुभम घुरे याने दुचाकीचा परीसरात शोध घेतला असता दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !