61 हजारांची रोकड लांबविली ; पिंप्रीतील घटना
धरणगाव : तालुक्यातील पिंप्री येथील किसान सेवा केंद्रातून एकाने 61 हजार 488 रुपयांची रोकड लांबविली. या प्रकरणी एकावर धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला
धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
चंद्रकांत फुलचंद चौधरी (55, रा.पिंप्री, ता.धरणगाव) हे मेडीकल चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान त्याच्या मालकीचे सोनवद रोडवरील श्री सिध्दीविनायक किसान सेवा केंद्र दुकानावर असतांना त्यांच्या जवळील 61 हजार 488 रूपयांची रोकड गावातील कृष्णा नामदेव ठाकूर (रा. बाबाजी चौक चाळीसगाव, ह.मु.पिंप्री ता.धरणगाव) याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी चंद्रकांत चौधरी यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी कृष्णा ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी करीत आहे.

