भडगावच्या तरुणाचा अज्ञातांच्या मारहाणीत मृत्यू, मृतदेह आणला पोलीस ठाण्यात


भडगाव : शहरातील 24 वर्षीय तरुणाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस आवारात आणून संशयीतांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सद्दाम अली फतरू अली (24, रा.यशवंत नगर, वरची बर्डी, भडगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

सेंट्रींग काम करणार्‍या तरुणाच्या मृत्यूने हळहळ
सद्दाम अली हे पत्नी यास्मीन व तीन मुलांसह राहतात. बांधकामावरील सेंट्रींगचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता सद्दाम अली हा नवीन पारोळा रोडवर असलेल्या ताडीच्या दुकानावर गेला. त्याठिकाणी असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दरम्यान सद्दाम हा बेशुध्दावस्थेत पडलेला असल्याची माहिती सद्दामचा भाऊ मोहब्बत अली याला मिळाली. त्यांनी तातडीने भावाला उचलून पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

मारहाणीचे कारण अस्पष्ट
मयत सद्दामला मारहाण का केली? याबाबत अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मयत झालेल्या सद्दाम अलीच्या नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन करत संशयीतांना अटक करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. भडगाव पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

भउगाव पोलीस ठाण्यात निवेदन
मयत सद्दामच्या पश्चात वडील फतरू अली रमजान अली, आई परवीनबी, भाऊ मोहब्बत अली, पत्नी यास्मीन, दोन मुली शुमेरा, जोया आणि 6 महिन्याचा इम्रान मुलगा असा परीवार आहे. मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे भडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !