भुसावळातील युवकाची तापी नदीत उडी
पुरामुळे तरुण वाहिल्याचा संशय ; रात्री उशिरापर्यंत शोध
भुसावळ- शहरातील 22 वर्षीय तरुणाने तापी नदीच्या पात्रात उडी घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. हतनूर धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आल्याने रात्री उशिरापर्यंत तरुणाचा शोध न लागल्याने हा तरुण बुडाल्याचा संशय व्यक्त होत आहे. भुषण विजय किनगे (22, आनंद नगर, भुसावळ) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शहर पोलिसांना याबाबत माहिती कळताच त्यांनी धाव घेतली मात्र रात्री उशिरापर्यंत आनंदचा शोध लागू शकला नाही. पुरामुळे हा तरुण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भूषणच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले असून भूषणदेखील कुटुंबियांचा एकूलता एक मुलगा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.