चाळीसगाव-कन्नड महामार्गावर अपघात : रुग्णवाहिकेच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू
चाळीसगाव : चाळीसगाव-कन्नड महामार्गावरील बोढरे शिवारात भरधाव रुग्ण वाहिकेने जोरदार धडक दिल्याने झालेल्याअपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा अपघात 2 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. दीपराज मोतीराम उर्फ नवनाथ चव्हाण (10, रा.मिटमिटा, ता.जि.औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे.
भरधाव रुग्णवाहिकेने उडवल्याने मृत्यू
औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणार्या सफेद निळ्या रंगाची रूग्ण वाहिकेने जोरदार धडक दिल्याने दिपराज मोतीराम उर्फ नवनाथ चव्हाण (10, रा. मिटमिटा, ता.जि.औरंगाबाद) या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चाळीसगाव ते कन्नड या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास बोढरे शिवारातील पैलवान ढाब्याजवळ घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी घटना घडताच रूग्णवाहिका ही कन्नड घाटाकडे पसार झाली. दरम्यान गणेश भावराव खरात (ह.मु. बोढरे शिवार) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन सोनवणे करीत आहेत.

