धक्कादायक : संपावर उतरलेल्या राज्यातील 376 कर्मचार्यांचे निलंबन
निलंबीत कर्मचार्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चौघा कर्मचार्यांचा समावेश
मुंबई : विविध मागणीसाठी एस.टी.कर्मचार्यांनी संपाची हाक दिल्यानंतर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारत राज्यभरातील 45 आगारातील 376 कर्मचार्यांचे निलंबन केल्याने कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली. निलंबीत कर्मचार्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चौघा कर्मचार्यांचा समावेश आहे. यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतलेला नाही.
तो पर्यंत कर्मचारी संपावर ठाम
जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करत नाही, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचार्यांनी घेतली आहे. न्यायालयानेही एसटी कर्मचार्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे निर्देश दिले होते, मात्र एसटी कर्मचार्यांनी हे आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. अशातच आता एसटी महामंडळानेही कर्मचार्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे तसेच औद्योगिक न्यायालयाने आणि उच्च न्यायालायानेही कर्मचार्यांचे हे आंदोलन चुकीचे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर जर कर्मचार्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी आंदोलन करणार्या कर्मचार्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. दरम्यान एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता राज्य शासनाने सरकारने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा दिली आहे.

आगारनिहाय निलंबीत कर्मचारी असे-
विभाग – आगार- निलंबीत कर्मचारी संख्या
नाशिक- कळवण-17
वर्धा – वर्धा ,हिंगणघाट-40
गडचिरोली- अहेरी,ब्रम्हपुरी,गडचिरोली- 14
लातूर- औसा, उदगीर, निलंगा,अहमदपूर, लातूर – 31
नांदेड-किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड,हादगाव,मुखेड,बिलोली, देगलूर – 58
भंडारा- तुमसर,तिरोडा, गोंदिया – 30
सोलापूर – अक्कलकोट- 2
यवतमाळ -पांढरकवडा, राळेगण , यवतमाळ – 57
औरंगाबाद – औरंगाबाद 1 – 5
परभणी – हिंगोली, गंगाखेड- 10
जालना -आफ्रबाद, अंबड -16
नागपूर – गणेशपेठ, घाटरोड,इमाम वाडा, वर्धमान नगर- 18
जळगाव- अमळनेर-4
धुळे -धुळे -2
सांगली – जत ,पलूस, इस्लामपूर, आटपाडी
एकूण- 376
