राष्ट्रीय ओबीसी मोर्चातर्फे भुसावळात लाक्षणिक धरणे आंदोलन


भुसावळ : ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व शेतकर्‍यांसाठी पारीत करण्यात आलेले तीन काळे कायदे रद्द करावेत प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा खान्देश विभागातर्फे शुक्रवार, 12 रोजी भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात गुरूवार, 25 रोजी धरणे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

तहसील प्रशासनाला निवेदन
आंदोलकांनी यावेळी तहसील प्रशासनाला निवेदन दिले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, जुनी सेवानिवृत्त योजना लागू करावी तसेच केंद्र सरकारने पारीत केलेले तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धरणे आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी मोर्चा खान्देश प्रभारी सुधाकर बडगुजर, संयोजक हारुण मन्सुर, रामराज परदेशी, बी.एस.सोनवणे, प्रमोद उंबरकर, विलास रंदाळे, जीवन पाटील, सुनील पाटील, विजय सावळे, कल्पना म्हस्के, कांचन सोनवणे, अपर्णा म्हस्के व आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !