शेअर चॅटवर वैयक्तिक माहिती दिल्याने महिलेविरोधात गुन्हा
जळगाव : ‘शेअर चॅट’ या सोशल मीडिया साईटवर एका 43 वर्षीय महिलेचे फोटो, मोबाइल नंबर अशी वैयक्तिक माहिती महिलेच्या परवानगीशिवाय दुसर्या एका महिलेने शेअर केली. त्याच अकाऊंटवरुन काही जणांनी चॅटींग केल्याने संबधित महिलेस अनोळखी लोकांचे फोन येऊन मनस्ताप झाला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन परस्पर माहिती शेअर करणार्या महिलेविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जळगाव सायबर सेलचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.
