जळगावात वृध्दाच्या हातातील नोटांचे बंडल लांबवत दुचाकीस्वार पसार
जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीत एका वृध्दाच्या हातातून साडे नऊ हजार रूपये अज्ञात तरूणाने हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा घडली घडली
शहरातील मेहरून येथील रहिवासी भास्कर विठ्ठल लाडवंजारी (67) हे पत्नी व मुलासह वास्तव्या असून त्यांचे रामेश्वर कॉलनीतील लक्ष्मी नगरात हार्डवेअरचे दुकान आहे. दुकानाच्या बाजूला त्यांचा मुलगा रघुनाथ लाडवंजारी यांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. 11 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे भास्कर लाडवंजारी यांनी दुकान सकाळी आठ वाजता उघडले. त्यानंतर ते दुचाकीचे खराब झालेले दुचाकीचे लॉक घेण्यासाठी पायी जात असतांना त्यांच्या जवळ एक अनोळखी 40 वर्षीय तरूण दुचाकीवर आला. त्याने सांगितले की, बाबा तुम्हाला दुचाकीने हार्डवेअर दुकानावर सोडून देतो म्हणत तरुणाने दुचाकी थांबवून दोन हजाराची नोट काढून सुटे मागितले असता सुटे देण्यासाठी भास्कर लाडवंजारी यांनी खिशातील 100 रुपयांचे बंडल काढले. त्याचवेळी दुचाकी धारकाने त्यांच्या हातातील नऊ हजार 500 रुपयांचे बंडल हिसकावून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी भास्कर लाडवंजारी यांनी रविवार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी धाव घेवून अनोळखी तरूणाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

