कुटुंब उत्तरकार्याला गेल्यानंतर तरुणाची गळफास घेत आत्महत्या : जळगावातील घटना
जळगाव : कुटुंबातील सदस्य उत्तरकार्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर 24 वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी रामेश्वर कॉलनीत घडली. सुरज उर्फ लखन हरी कंगार (24) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
एमआयडीसीत कंपनीत कामाला असलेल्या सुरजने आत्महत्या का केली? हे स्पष्ट होवू शकले नाही. सुरज हा रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ तो कुटुंबासह वास्तव्याला होता. रविवारची सुटी असल्याने तो एकटाच घरी होता तर वरणगाव येथे नातेवाईकाचे निधन झालेले असल्याने वडिल हरी दिगंबर कंगार, आई मालती, मोठा भाऊ मुकेश, वहिनीी असा संपूर्ण परीवार सकाळीच वरणगावी गेला असताना सायंकाळी सहा वाजता भाऊ मुकेश पुढे घरी आला असता सूरज याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. दुपारी तीन वाजेच्या जवळपास त्याने गळफास घेतल्याचा अंदाज आहे. मुकेश व इतरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. हवालदार रतीलाल पवार यांनी पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

