चर्चा जळगाव जिल्ह्याची कारवाई मात्र नांदेड जिल्ह्यात : एनसीबीने चार कोटींचा गांजा केला जप्त


नांदेड : मुंबई येथील एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटे ाच वाजेच्या सुमारास नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे एका ट्रकमधून (एम.एच.26 ए.डी.2165) मधून सुमारे 35 गोण्यांतील तब्बल 4 कोटींचा गांजा जप्त केला. विशाखापट्टणम येथून राज्यात विक्रीसाठी हा गांजा आणण्यात आल्याची गोपनीय माहिती एनसीबीला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाई नांदेड जिल्ह्यात झाली असलीतरी सोमवारी सकाळपासून मात्र जळगाव जिल्ह्यात कारवाई झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या गोटातही प्रचंड खळबळ उडाली. यंत्रणेने सर्वत्र खबर्‍यांना कामाला लावत कारवाईचा मागोवा घेतला मात्र अशी कारवाई झालीच नसल्याचे स्पष्ट झाल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला.

एनसीबीच्या कारवाईने खळबळ
नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई येथील एनसीबी पथकास खबर्‍याने दिली.यामाहितीवरून एनसीबी पथकाने आज पहाटे मांजरम येथे सापळा लावला. ग्रामस्थ, स्थानिक पोलीस आदींच्या मदतीने पथकाने एक ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता 35 गोण्यांमध्ये तब्बल 4 कोटींचा गांजा आढळून आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई एनसीबी अधिकारी अमोल मोरे, सुदाकर शिंदे, संजय गवली, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांनी केली. तर पथकास गजानन पाटील चव्हाण, सरपंच श्रीकांत नीळकंठ मांजरमकर, पोलीस पाटील जयराज पाटील शिंदे, वसंत शिंदे, इंद्रजीत पटवे, बापूराव पटवे यांच्यासह मांजरम ग्रामस्थांनी मदत केली.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !