दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यातील घटना


जळगाव : शतपावली करण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेस मद्यपी दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वावडदा येथे घडली. संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण तापले आहे.

शतपावली करताना दिली धडक
तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय 21) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. यावेळी सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योती यांना मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला सुमारे 25 फुटांपर्यंत फरफटत नेले. यात त्या गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ हलवण्यात आले असता उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत दुचाकीस्वार हा मद्यधूंद अवस्थेत असल्याचे समजते.

गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंब आक्रमक
सोमवारी सकाळी ज्योती गोपाळ यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिला. संबंधीत दोषी दुचाकीस्वाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आल्याने वातावरण तापले होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !