आगामी विधानसभा निवडणुकीसाठी झपाट्याने कामाला लागा
मुन्वर खान ; उमेदवार संजय ब्राह्मणेंच्या विजयासाठी दिल्या शुभेच्छा
भुसावळ- आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे हेच उमेदवार असतील, त्यांच्या विजयासाठी झटून कामाला लागा, असे आवाहन शहर काँग्रेस कमेटीच्या कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुन्वर खान यांनी येथे केले. खान यांच्या 57 वा वाढदिवस हितवर्धिनीच्या सभागृहात संजय ब्राह्मणे यांच्या प्रमुख उपस्थितीसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुन्वर खान यांनी मनोगतात लोकसभा निवडणुकीत शहरातून काँग्रेस उमेदवाराला मिळालेली भरघोस मते आपल्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार नीळकंठ फालक, संजय ब्राह्मणे, रवींद्र निकम यांनी मुन्वर खान यांचा सत्कार केला. प्रसंगी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या पदाधिकार्यांची उपस्थिती
युतचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, डॉ.मयुरी, मुसा पिंजारीर, कदीर खान, ईलियास सैय्यद, राज मोहम्मद, अमीर खान, शकील खान, ईकबाल भाई, सै.कव्वसर, गफुर खाटीक, ईरफान मणियार, अशपाक काझी, शैलैश बोदडे, रहीम कुरेशी, ईस्माईल गवळी, कलीम लीडर, तस्लीम पहेलवान, शैलेंद्र नन्नवरे, राजु पटेल, रधु सेठ, विवेक नरवाडे, अशरफ खान, जॉनी गवली, संजय खडसे, जगपालसिंह गील, भगवान मेढे, फकरु भाई, डॉ.नईम मजहर हाजी सलीम भाई पिंजारी, नसीम तडवी, शुभम तायडे, भीमराव तायडे, प्रवीणसिंग पाटील, कल्पना तायडे, हमीदा गवळी, शमीम कुरेशी, अन्वर तडवी, यु.एल.जाधव, नरवाडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रहिम कुरेशी तर प्रास्ताविक प्रवीणसिंग पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे शहराध्यक्ष सलीम गवळी यांनी केले.