पाचोर्‍यातील 54 वर्षीय इसमाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू


पाचोरा : धावत्या रेल्वेखाली सापडून पाचोर्‍यातील 54 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुभाष संपतराव नागणे (54, पुनगाव रोड, पाचोरा) असे मयताचे नाव आहे.

रेल्वेच्या धडकेने मृत्यू
रेल्वे लाईन खंबा कि. मी. नं. 371 / 9 / 8 नजीक डाऊन लाईनवर का मालगाडीखाली आल्याने मंगळवार, 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास 54 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती पी. सी. पी. के. (मालगाडी) लोको पायलट यांनी पाचोरा स्टेशन मास्तर यांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आढळून आले. ए. टी. एम. च्या आधारे बँकेत चौकशी केली असता मयताचे नाव सुभाष संपतराव नागणे असल्याचे निष्पन्न झाले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने अति रक्तश्रावामुळे त्यांचा जागेवर मृत्यू झाला. मृतदेह हा पोलीस नाईक दिनेश पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेची माहिती कळवून मृतदेह त्यांच्या परीवाराच्या स्वाधीन करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !