मेहरूण येथे तरूणावर चाकूने हल्ला : तिघांविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील मेहरुण येथे घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या तरुणाने हातात चाकू धरण्यास नकार दिल्याने त्याच चाकूने तरुणावर वार करीत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रेहान खान महमूद खान (21) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहरुण परीसरातील मिल्लत मशिदीसमोर रेहान खान महमूद खान हा तरुण कुटुंबासह राहतो. सोमवारी दुपारी रेहान अंगणात उभा असतांना संशयीत आरीफ शहा व त्याच्यासोबत इतर दोघे जण आले. त्यांनी त्यांच्याकडील चाकू रेहान यास हातात पकडण्याचे सांगितले. रेहानने नकार दिला असता, आरीफ शहा याने त्याच चाकूने डोळ्याखाली वार केले तर इतर दोघांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत रेहान हा जखमी झाला. रेहानने दिलेल्या तक्रारीवरुन आरीफ शहा, काल्या (पूर्ण नाव माहित नाही), बंदर पूर्ण नाव माहित नाही (तिघे रा. सालारनगर) अशा तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहेत.

