भाजपा-सेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : तापी मेगा रीचार्जसह नार-पार योजना मार्गी लावण्याची ग्वाही

जळगाव : भाजपा व शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत केले. भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जळगाव विमान तळासमोरील मोकळ्या जागेत सुरू झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसची अवस्था आधे ईधर आव, आधे उधर जावो असल्याचे सांगून राहुल गांधींच्या राजकीय विजनवासावर त्यांनी टिका केली. तापी मेगा रीचार्ज योजनेच्या माध्यमातून चार लाख एकर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे त्यांनी सांगत नार-पार योजना मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित आहेत.






आम्ही नटरंग नाही -मुख्यमंत्री
आम्ही नटरंग नाही, त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळली असल्याने, ते असे हातवारे करीत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.‘खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परीस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

(जळगावातील सभेची माहिती अपडेट पाहण्यासाठी लिंक रीफे्रश करीत रहा)



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !