जळगावच्या औद्योगिक विकासासह रोजगार उपलब्ध करून देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही : जळगावात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

जळगाव : जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात भरभराट आणून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात दिली. जळगावातील विमानतळाच्या समोरील जागेवर भाजपा महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी त्यांची जाहीर सभा झाली. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक नाही. जे सांगू ते करू. जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविल्याने देशातील काही राजकीय नेते व पक्ष देशहिताच्या निर्णयावरून राजकारण करीत असल्याचे ते म्हणाले.

कार्यकर्त्यांना मोठे होवू न देणारे जनतेचा काय विकास करणार !
कार्यकर्त्यांना मोठे होवू न देणारे जनतेचा काय विकास करणार, अशी कोपरखळी मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतील गंमत सांगितली. ते म्हणाले की, सोशल मिडीयावर सत्काराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याबाबत सत्यता तुम्हीच तपासा, असेही ते म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मराठीतून संवाद साधत जळगावातील सभा अदभूत असल्याचे सांगितले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !