विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
पेरणे-जगताप वस्ती येथील घटना
वाघोली : महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनीचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास पेरणे (ता. हवेली) येथील जगताप वस्ती येथे घडली. एक गाय व पाळीव कुत्र्याचा देखील करंट बसून मृत्यू झाला असून, शेतकऱ्याचा मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले आहेत. एचटी लाईनच्या तुटलेल्या तारेबाबत एमएसईबीला कळवूनसुद्धा काम केले नसल्यामुळे एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. भगवान रामकृष्ण जगताप (रा. जगताप वस्ती) असे करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.