सव्वा लाखांचे बांधकाम साहित्य लांबवले


जळगाव : एमआयडीसी परिसरात असलेल्या जळगाव-औरंगाबाद रोडवरील मैत्रेया चौकात असलेल्या एका हॉटेलच्या बांधकामाच्या साईटवरून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 29 हजार रुपये किंमतीचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
एमआयडीसी जळगाव परीसरातील जळगाव-औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल मैत्रेय चौफुलीवर एका हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या देखरेखीसाठी योगेश झिपरू शिंदे (57, रामानंदनगर जळगाव) हे देखरेखीसाठी आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या मिस्तरी जावेद शेख मोयुद्दिन (रा. दंगल ग्रस्त कॉलनी, जळगाव) यांनी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता काम आटोपून बांधकामाचे सर्व साहित्य दुसर्‍या मजल्यावर असलेल्या स्टोअर रूममध्ये ठेवून कुलूप लावले होते. दरम्यान मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मिस्तरी जावेद शेख मोयुद्दीन बांधकामाच्या ठिकाणी गेले असता त्यांना बांधकामाचे साहित्याची चोरी झाल्याचे तसेच स्टोअर रूमचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता बांधकाम साहित्याची चोरी झाल्याचे उघडकीला आले. या ठिकाणी बांधकामाचे विविध साहित्य असा एकूण 1 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी योगेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी व नाईक सचिन पाटील करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !