अल्पवयीन मुलीची छेड काढून धमकावले : दोघांविरूध्द गुन्हा


पारोळा : तालुक्यातील शिरसमणी येथील अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला धमकावल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पारोळा पोलिसात गुन्हा
शिरसमणी येथील 15 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिल्यानुसार गावातील सायबू उर्फ समाधान मागू पाटील व भावेश गोटू वंजारी हे पीडित तरुणीचा सतत पाठलाग करून छेड काढत होते. शुक्रवार, 10 रोजी पीडित तरुणी पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना संशयीत सायबू याने तिला लग्नाची मागणी केली तसेच लग्न न केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी संशयीताने पीडीतेला चाकूचा धाक दाखवला होता. यामुळे घाबरलेल्या युवतीने घरात ठेवलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी आई-वडिलांनी तिला पारोळा येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले. चार दिवस उपचार घेतल्यानंतर 14 रोजी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी पीडीतेचा जबाब नोंदवला. त्यानंतर दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !