चोरट्यांनी रोकडसह मोबाईल लांबवला : शाहु नगरातील घटना
जळगाव : शहरातील शाहू नगरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातून रोकड आणि मोबाईलची चोरी केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
सुवर्णा मंगल बांगडे (40, रा.शाहू नगर, जाणता राजा चौक, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेच्या दरम्यान कुटुंबियांसह सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील चार हजार 200 रुपयांची रोकड आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सुवर्णा बांगडे यांनी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय निकुंभ करीत आहे.





