शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याने लोखंडी कोयत्याने मारहाण : चाळीसगाव तालुक्यातील घटना


चाळीसगाव : तालुक्यातील करगांव तांडा क्र. 1 येथे किरकोळ कारणावरून दोघांना लोखंडी कोयत्याने जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शिविगाळचा जाब विचारल्याने मारहाण
चाळीसगाव तालुक्यातील करगांव तांडा क्र.1 येथील नंदलाल मोहन राठोड यांच्या घरासमोर काही जण आरडाओरड करून शिविगाळ करीत असल्याने रमेश भवन राठोड हा त्या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी गेला मात्र त्याचाच राग आल्याने नंदलाल राठोड यांनी शिविगाळ करून लोखंडी कोयत्याने रमेश राठोड याच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली. मनीषा नंदलाल राठोड यांनी भवन शंकर राठोड (60) यांचे पाय ओढून कोयत्याने डाव्या कानावर, गालावर व पंजावर मारहाण करून जबर दुखापत केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात दोघांनाही गंभीर दुखापती झाल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. ही घटना सोमवार, 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. भवन शंकर राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात नंदलाल मोहन राठोड व मनीषा नंदलाल राठोड यांच्याविरुद्ध भादंवि कलम 307, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहा.निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !