अज्ञात वाहनाची धडक : यावलच्या वृद्धेचा मृत्यू


जळगाव : तालुक्यातील आमोदा ते घार्डी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत यावल येथील 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 15 रोजी रात्री पावणेअकरा वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आधी सुरूवातीला मयताची ओळख पटलेली नव्हती मात्र आता ओळख पटली असून मयत वृद्धा यावल येथील खाटीकवाड्यातील रहिवासी असून त्यांचे नाव नजमा बी.खाटीक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर वृद्धेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी आमोदा येथील पोलिस पाटील राहुल पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !