कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ ; पतीसह चार जणांवर गुन्हा


जळगाव : कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह चार जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात राहणार्‍या भावना रवी चौधरी (9) यांचा विवाह पंजाब राज्यातील खमाने येथील रवी प्रमोद चौधरी यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतर पती रवी चौधरी याने लग्नात काहीही दिलेले नाही, असे टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर लग्नात तुझ्या वडीलांना कार घेण्यासाठी पाच लाख रूपये दिले नाही, तसेच लग्नाच्या वेळी घरगुती वापराचे सामान दिले नाही या कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर सासू, नणंद आणि नंदाई यांनी पैश्यांचा तगादा लावला होता. वडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने आपण पैश्यांची पुर्तता करून शकत नाही असे सांगितल्यावेर पती रवी चौधरी याने विवाहितेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने माहेरी निघून आल्या. विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार 16 डिसेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्यात पती रवीप्रमोद चौधरी, सासू अंजली प्रमोद चौधरी, नणंद प्रीती प्रकाश चौधरी, नंदोई प्रकाश रामकिशन चौधरी (दोन्ही रा.नवागाम दिंडोली, जि.सुरत गुजराथ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !