विष प्राशन करीत तरुणाची आत्महत्या : चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव : तालुक्यातील गणपूर येथील एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. भाऊसाहेब दिगंबर कुमावत (35) असे मयताचे नाव आहे
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तालुक्यातील गणपूर येथील भावसाहेब दिगंबर कुमावत (35) याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास विजय शिंदे करीत आहेत.





