चोरटे सैराट : अमळनेरात बंद घरातून साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला


अमळनेर : शहरातील केशवन नगरातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील साडे तीन लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीमुळे पसरली घबराट
ज्ञानेश्वर वसंत वारूळे (62, रा.साईलाल केशव नगर, अमळनेर) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 16 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 ते 3.30 वाजेच्या दरम्यान कामाच्या निमित्ताने घराचा दरवाजा बंद करून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचा बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे लांबवले. यात सुमारे 3 लाख 65 हजाराचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी ज्ञानेश्वर वारूळे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शत्रृघ्न पाटील करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !