गळा दाबून युवकाचा खून : जिल्ह्यातील …या गावात घडली घटना
नंदुरबार : 18 वर्षीय युवकाचा खून करण्यात आल्याची नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चौगाव, रापापूर शिवारात घडली. या घटनेत विपुल टेट्या पावरा (18, रा.दोजापाणी, ता.तळोदा) या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात तळोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळकरांसह जळगाव जिल्हावासीयांची चिंता वाढली : एकाच दिवशी कोरोनाचे 9 रुग्ण आढळले
शवविच्छेदनातून खुनाचा गुन्हा उघड
विपुल पावरा या तरुणाचा मृतदेह तळोदा तालुक्यातील रेवानगर गावाच्या पुढे चौगांव शिवार व रापापूर रस्त्याच्या बाजुला शेतामध्ये 22 ते 23 डिसेंबरदरम्यान आढळला होता. सुरूवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अहवालातून मयताचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अनोळखीविरुध्द तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत टेट्या वनकर पावरा (रा.दोजापाणी, ता.तळोदा) यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.





