भुसावळात शिवसेनेतर्फे ई- श्रम कार्ड वाटप


भुसावळ : शहरातील शिवसेनेच्या जुना सातारा भागातील विभागीय कार्यालयत माजी नगरसेवक दीपक धांडे आणि माजी नगरसेविका शारदा धांडे वतीने 242 आरोग्य कार्ड, 110 श्रम कार्ड, 63 युनिव्हर्सल पासचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, ऍड. निर्मल दायमा, माजी नगरसेवक अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे, पिंटू भोई, अमोल पाटील उपस्थित होते.

हेल्थ कार्डमुळे अनेक लाभ : दीपक धांडे
समाजातील विविध क्षेत्रांत काम करणार्‍या मजूर वर्गाच्या व अंत्योदय घटकाच्या उत्थानासाठी सरकारने राबविलेल्या उपक्रमाअंतर्गत ई-श्रम ही योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहायता, लाभार्थींच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ, कोणत्याही कामासाठी लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी सहायता, घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, वीज बिल सबसिडी, उपचारासाठी चिकित्सा रक्कम असे अनेक फायदे मजूर मार्गाला होणार आहेत. जन आरोग्य योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड मिळाले आहेत त्यांना आरोग्याच्या कोणत्याही समस्ये संदर्भात 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा प्रती वर्ष मिळणार आहेत. युनिव्हर्सल पास असणार्‍यांना प्रवास करता येईल, अशी माहिती दीपक धांडे यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !