यंदापासून तीर्थक्षेत्र संत मुक्ताईच्या महतनगर पुण्यभूमीला होणार परीक्रमा !

ह.भ.प रविंद्र हरणे महाराज यांच्या संकल्पनेतून परीक्रमेचा मार्ग निश्चित


मुक्ताईनगर : ह.भ.प रवींद्र हरणे महाराज यांच्या संकल्पनेतून मुक्ताई महतनगर परीक्रमेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्रमेला सुरूवात होणार आहे.

रवींद्र महाराजांची स्तुत्य संकल्पना
मुक्ताईनगरच्या भूमित मार्कंडेय ऋषी, योगीराज चांगदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव महाराज अशा अनेक अगणित संतांच्या ऋषिमुनींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. त्यातच आदिशक्ती मुक्ताई याच भूमीत संजीवन अंतर्धान पावल्याने या भूमीच्या प्रत्येक कणाकणात रज-कणात अध्यात्मिक ऊर्जा सामावलेली आहे तसेच हजारो वनस्पतींच्या वनराईने नटलेली ही भूमी असून इतर धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्र या ठिकाणी जशी भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा व शक्ती, मानसिक समाधान मिळत असते त्याच धर्तीवर आदिशक्ती मुक्ताईच्या भूमीला देखील परीक्रमेचा मार्ग असावा, असा मनाशी संकल्प बांधून आदिशक्ती मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगरचे पालखी सोहळा प्रमुख हरीभक्त पारायण रवींद्र हरणे महाराज यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीला एक परीक्रमेचा मार्ग असावा व या परीक्रमेतून भाविकांना आई मुक्ताईची सेवा करण्याची संधी मिळावा, अशी संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला आता मूर्त स्वरूप आले असून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्रमेला सुरूवात होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !