भुसावळकरांची वाढली चिंता : डीआरएम कार्यालयात 17 कर्मचारी पॉझीटीव्ह ; शहरात वेगाने कोरोना संक्रमन
भुसावळ : शहरात बुधवारी सलग दुसर्या दिवशी शंभरावर कोरोनाबाधीत आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुधवारी नवीन 135 रुग्णांमुळे शहरासह तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 437 वर पोहोचली आहे. डीआरएम कार्यालयात 106 संशयीत रुग्णांची बुधवारी अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. यात 17 अधिकारी व कर्मचारी बाधित आढळले. बुधवारी शहर आणि तालुक्यातील नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली. 5 जानेवारीला झालेल्या चाचणीत हे बाधीत आढळून आले होते. सात दिवसांच्या उपचारानंतर आठव्या दिवशी त्यांना डिस्जार्ज मिळाला.
या भागात वाढले कोरोना रुग्ण
शहरातील डॉ. आंबेडकर नगर, सृष्टी अपार्टमेंट, गडकरी नगर, शिव कॉलनी, लक्ष्मी नगर, तापीनगर, शिवदत्ननगर, अॅक्वा अपार्टमेंट खडका चौफुली, टोकेनगर, वाल्मीकनगर, न्यू आंबेडकर नगर, सिंधी कॉलनी, काझी प्लॉट, तीन नंबर शाळेजवळचा परिसर, शांतीनगर, आनंद नगर, शिव कॉलनी, जुना सतारे, हुडको परिसर, खळवाडी, हनुमाननगर, स्वामी विहार, अमृत कॉलनी, कवाडे नगर, सहकारनगर, नंदनवन कॉलनी, वांजोळा रोड परिसर, सागर नगर, प्रल्हादनगर, रजा टॉवर, पांडुरंगनाथनगर, नवनाथ मंदिर परिसर, रजा टॉवर भाग, मन्यार हॉल परिसर, केशवनगर, नारायण नगर, म्युनिसीपल पार्क, आनंद नगर, तुकाराम नगर, मिल्लत नगर, सुंदर नगर आदी भागात रुग्ण आढळून आले. तर रेल्वे क्वार्टर, रेल्वे कॉलनी भाग, लिंम्पस क्लब, विंध्याचल कॉलनी, तापी ऑफिसर कॉलनी, भिमा कॉलनी, झेडटीएस भाग, ऑफिसर कॉलनी,गार्ड लाईन, पूर्णा कॉलनी या रेल्वे कर्मचारी वसाहत भागातही रुग्ण आढळून आले आहेत.
डीआरएम प्रशासनाची वाढली चिंता
डीआरएम कार्यालयात 17 कर्मचारी पॉझीटीव्ह आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस परीसर व दादासाहेब रुपवते हौसिंग सोसायटी भागात पती-पत्नी, चाळीस बंगला भागात मुलगी व आई, श्रीनगर भागातील 28 वर्षीय मुलगा आणि वडील, रेल्वे कॉलनीत दोन्ही भाऊ, सिंधी कॉलनी मुलगा आणि वडील असे एकाच घरातील दोन सदस्य बुधवारी बाधीत आढळले.


