कोरोना प्रादुर्भाव : यावल शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार बंद


यावल (काबीज शेख) : कोरोना रुग्णांची संख्या पाहता तसेच जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडील पुढील आदेश येईपर्यंत शुक्रवार, 14 जानेवारीपासून यावल शहरातील आठवडे बाजार बंद करण्याचे निर्देश यावल पालिकेने काढले आहे.

दुकाने न लावण्याचे आवाहन
या संदर्भात प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती काढण्यात आली आहे. सर्व व्यापारी व नागरीक आणि खेड्यावरील सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन यावल नगर परीषदेचे मुख्याधिकारी यावल यांनी पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने हा आदेश काढला आहे. व्यावसायीकांनी दुकाने लावून नये तसेच बाजारासाठी खेड्यावरून दुकानदारांनी येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !