बर्हाणपुरातील ‘सिंगर’ स्पर्धेत विधी पाटीलचा प्रथम क्रमांक
रावेर : बर्हाणपूर येथे कला साहित्य सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित टॅलेंट हंट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सिंगर म्हणून रावेर शहरातील विधी प्रवीण पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. बर्हाणपूरला आयोजित टॅलेंट हंटतर्फे आयोजित स्पर्धेची ग्रंड फायनल नुकतीच झाली. यात सिंगर क्षेत्रात पाचवीचे बर्हाणपूर येथे शिक्षण घेणारी विधी प्रवीण पाटील हिने प्रथम क्रमांक पटकविला. विधी ही रावेर शहरातील फोटोग्राफर तथा पत्रकार प्रवीण पाटील यांची कन्या आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास खासदार ज्ञानेश्वर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष मनोज लधवे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजय रघुवंशी, संस्थापक अध्यक्ष निलेश महाजन, आनंद चौकसे, उमेश जंगले, संदेश माहेश्वरी, अर्चना गोविंदजीवाला, राजेश सावकारे, विकास ठाकूर, सुधाकर महाजन आदींची उपस्थिती होती. गायन स्पर्धेत परीक्षकांच्या भूमिकेत डॉ.सतीश वर्मा, प्राचार्य रागिणी विनयकुमार जोशी-खरगोणे, नामदेव भोयटे, भारती मालवीय (मुंबई), रवी फुलमाळी, विजय महाजन, कला साहित्य व सांस्कृतिक मंचाचे संरक्षक विरेंद्र सिंग ठाकूर, चित्रकार राज भावसार, उपाध्यक्ष जिकेश माग्रे, सुनंदा वानखेडे, सचिव ऋषी मुलतकर, सहसचिव प्रिया हसनंदानी, खजिनदार कमलेश पांजराई, अश्विन मुलाटकर, डॉ.कुणाल मालवीय उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप मोरे तर आभार जिकेश मगरे यांनी मानले
स्पर्धेत 36 मुलांनी घेतला सहभाग
एका हॉटेलात झालेल्या स्पर्धेत 36 मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यात ज्युनियर गटात सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून विधी पाटील तर सर्वोत्कृष्ट डांसर म्हणून हितांशी अग्रवाल हिने प्रथम क्रमांक पटकावला. वरीष्ठ गटात सिंगरमध्ये नंदलाल सनांसे, गायकमध्ये मोहम्मद तर सुपर सिनियर गटात डांसरमध्ये दिलप्रीत चीमा सर्वोत्कृष्ट ठरला.


