चाळीसगाव शहरातील एकाच भागातील दोन युवती बेपत्ता


चाळीसगाव : शहरातील एका भागात (Chalisgaon City) राहणार्‍या दोन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

शहर पोलिसात हरवल्याची नोंद
चाळीसगाव शहरातील (Chalisgaon City) एका भागात राहणार्‍या 19 वर्षीय दोन तरुणी बुधवार, 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घरात कुणालाही काही एक न सांगता निघून गेल्या मात्र आजपावेतो त्या घरी न परतल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात (Chalisgaon City Police Station) हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार अजय मालचे करीत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !