प्रहार जनशक्ती पार्टीच्या अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी फिरोज शेख


भुसावळ : प्रहार जनशक्ती पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील फिरोज शेख यांची सोमवार, 17 रोजी निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना नियुक्ती पत्र भुसावळ येथील कार्यालयात देण्यात आले. बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांनुसार पुढील काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्यासह पक्ष संघटना फिरोज शेख हे मजबुतीने उभी करतील, असा आशावाद यावेळी अनिल चौधरी यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
निवडीप्रसंगी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे, भुसावळ शहराध्यक्ष प्रकाश कोळी (खन्ना), माजी नगरसेवक हाजी मल्लूशेठ मेमण, जमीन चुडीवाले, आमीन कुरेशी, युवक शहर उपाध्यक्ष राकेश अहिरे, सोशल मीडियाप्रमुख भूषण जेठवे, मेहमूद पठाण, नावेद खान, कलीम शेख, फिरोज खान ठेकेदार, अनवर अण्णा, नजर शेख व सर्व पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !