नंदुरबार जिल्हा : पहिल्या चार तासात 19 टक्के मतदान
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चार मतदारसंघात सोमवारी सकाळी 7 ते 11 या चार तासादरम्यान सुमारे 18.77 टकके मतदान झाले. अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून
मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 पर्यंत 24.2 शहादा 22.75, नवापूर 21.9 तर सर्वाधिक कमी नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी 7.88 टक्के मतदान झाले. सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मतदानाचा सर्वाधिक उत्साह दिसून आला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
निवडणुकीत कुठलाही गैरप्रकार होवू नये यासाठी जिल्ह्यात एक हजार 100 स्थानिक पोलीस, 855 होमगार्डस, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय चार संवेदनशील मतदान केंद्र आणि 42 इतर मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






