रावेरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; प्रकरण मिटवण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी ; तिघा तरुणांना अटक
रावेर : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिचा विनयभंग करण्यात आला शिवाय अल्पवयीन मुलीच्या वडीलांना प्रकरण मिटवण्यासाठी पंधरा लाखांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला असून या प्रकरणी तिघांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघा आरोपींना रावेर पोलिसांनी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भुसावळातील रस्ते रेंगाळले : ठेकेदार विनय बढे कंपनी दोन वर्षांसाठी ‘काळ्या यादीत’
तिघांविरोधात गुन्हा दाखल
संशयीत आरोपी जयेश मोतीलाल सपकाळे (रा.आदर्श नगर, रावेर) याने 2019 ते 2020 दरम्यान एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली तर आरोपीचे साथीदार गणेश विश्वनाथ भावसार व अमोल इंगळे (दोन्ही रा.रावेर) यांनी या प्रकरणी 15 मार्च 2022 रोजी आम्हाला पंधरा लाख रुपये द्या नाही तर तुमच्या मुलीची बदनामी करू, अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांनी रावेर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही आरोपींना गुन्हा दाखल केल्यानंतर रावेर पोलिसांनी अटक केली तर न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहे.




