Kirit Somaiya किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा : मुख्यमंत्र्यांची झोप उडणार ; सहा घोटाळे बाहेर काढणार !


Kirit Somaiya मुंबई : नेहमीच खळबळजनक विधानामुळे चर्चेत असलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे नव्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. थेट ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल करीत सोमय्या म्हणाले की, लवकरच सहा घोटाळे बाहेर काढणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे सहा कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाईने केल्यानंतर खळबळ उडाली असतानाच सोमय्या यांच्या दाव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

ईडीच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावे
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परीषदेत ठाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही सवाल त्यांनी केला.



33 लाखांच्या थकबाकीमुळे मुक्ताईनगरात बीएसएनल टॉवरला सील 

सोमय्यांच्या रडारवर आता आदित्य ठाकरे
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले की, आदित्यने (Aaditya Thackeray) 2014 मध्ये आई रश्मी ठाकरे सोबत कोमो स्टॉक अ‍ॅण्ड प्रॉपर्टीज ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आदित्य (Aaditya Thackeray) यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. आता ही कंपनी देशातील मोठा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. उद्धव यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. आदित्य श्रीधर आणि रश्मी यांच्यात कौटुंबिक संबंधासोबत आर्थिक संबंध आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे अशीही मागणी सोमय्या यांनी केली. शेल कंपन्याच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, मनी लाँड्रिंग केली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी द्यावे याचे उत्तर : सोमय्या
आगामी काही दिवसांत आणखी सहा छोटे-मोठे घोटाळे बाहेर येणार असून तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे. एव्हढा पैसा कुठून आला, महापालिकेच्या कंत्राटदारांकडून आला की दोन वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यातून पैसे जमा झाला ? असा आरोप करीत याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव यांनी देण्याची मागणीदेखील सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.

रावेरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; प्रकरण मिटवण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी ; तिघा तरुणांना अटक





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !