मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट : जळगावात एकास शिवसैनिकांनी चोपले


जळगाव : सोशल मीडियावर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या एका व्यक्तीला संतप्त शिवसैनिकांनी सेना स्टाईल चोपल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

सोशल मिडीयावर टाकली आक्षेपार्ह पोस्ट
धरणगाव येथील हेमंत द्वितीये एका व्यक्तीने सोशल मीडियावरील जळगाव शहराच्या एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.
ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स थिएटरला ‘मिशन काश्मीर’ चित्रपट पाहण्यासाठी आला होता. शिवसैनिकांनी त्याच्यावर पाळत ठेवत थिएटरसमोर त्यास बेदम मारहाण करत पोस्ट टाकल्याचा निषेध व्यक्त केला.



पुन्हा पोस्ट टाकल्यास असाच चोप देणार
हेमंत द्वितीये याने माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली म्हणत त्याबद्दल माफी मागतो असं वक्तव्य केल्यामुळे त्यास सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या विरोधात पोस्ट टाकली जाईल, त्यांना असा जाहीर चोप दिला जाईल, असेही यावेळी शिवसैनिकांनी सांगीतले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी जिल्हा याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !